पोलिसांकडे तक्रार दिल्याने महिलेच्या खुनाचा प्रयत्न

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

पतीविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून पोलिसांकडे तक्रार दिल्याने एकाने पत्नीचा दोरीने गळा आवळून तिचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना हडपसरमधील महंमदवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.

पुण्यात नववीच्या विद्यार्थीनीकडून ४२ वर्षीय शिक्षकेला प्रपोज – सविस्तर बातमी

अनिल पंढरीनाथ माने (वय ४२, रा. साठेनगर, तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत माने याची पत्नी जया (वय ३५) हिने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल आणि त्याच्या पत्नीत कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. वादातून पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. सोमवारी (२२ डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाले. वादातून अनिलने पत्नीचा दोरीने गळा आवळला, तसेच डोक्यात गज मारला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×