Breking News
शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंगमुख्यमंत्र्यांनी दावोस मधून अनुभवला भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरारपुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरारपुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडारलढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला बेड्यामनी लॉड्रींगच्या धमकीने महिलेला गंडाकुख्यात घायवळ टोळीविरूद्ध ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्रजेष्ठाची सायबर चोरट्यांकडून तब्बल २२ कोटींची फसवणूक

पुण्यात नववीच्या विद्यार्थीनीकडून ४२ वर्षीय शिक्षकेला प्रपोज

सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याची दिली धमकी

marathinews24.com

पुणे – नामांकित शाळेत नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने थेट ४२ वर्षीय शिक्षिकेला प्रेमप्रस्ताव दिला, “आय लव्ह यू” असे संदेश पाठवत अश्लील चॅटिंग केले. हातावर ब्लेडने शिक्षिकेचे नाव कोरले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जर प्रेम स्वीकारले नाही तर शाळेच्या सातव्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे शाळेतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. दामिनी मार्शल आयोध्या चेचर यांनी विद्यार्थीनीचे समुपदेशन केल्‍याने मोठा अनर्थ टळला.

पुणे पोलिसांचा नागरिकांना सुखद धक्का; २१ मोबाइल मिळवून दिले -सविस्तर बातमी

शिक्षिकेच्या मोबाईलवर सातत्याने इमोजींसह संदेश येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. “तुम्ही मला खूप आवडता, तुम्ही दुसऱ्यांशी बोललेले मला चालत नाही, तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही,” अशा आशयाचे संदेश पाठवत विद्यार्थिनीने मानसिक दबाव निर्माण केला होता. शिक्षिकेने अखेर शाळा प्रशासनाला माहिती दिली.

प्रकाराची तीव्रता वाढत असतानाच, २ डिसेंबरला संबंधित विद्यार्थिनीने तिच्याच वर्गातील मुलीला वॉशरूममध्ये गाठून “तू खूप सुंदर दिसतेस, तुला बॉयफ्रेंड आहे का?” अशी विचारणा केली. घाबरलेल्या विद्यार्थिनीने तात्काळ उपमुख्याध्यापिकांकडे तक्रार केली.

नववीतील चार ते पाच मुलींनाही तिने ‘आय लव्ह यू’चे संदेश पाठवले होते आणि त्यांच्या हातात अंगठी घालण्याचा प्रयत्न केला होता. वर्गात न बसता शाळेत फिरणे आणि शिक्षिकेकडे एकटक पाहणे हे तिचे रोजचेच झाले होते.

घडामोडी गंभीर होत असल्याचे लक्षात येताच, मुख्याध्यापिकेने दि. ८ डिसेंबरला कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत दामिनी मार्शल आयोध्या चेचर यांच्‍याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने शाळेत भेट दिली. कारवाईऐवजी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समुपदेशनाचा मार्ग निवडत, विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन तिचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेत मार्ग काढला.

शरीरातील हार्मोन्समध्ये होत असलेल्या बदलांमुळे आणि इंटरनेटवर पाहिलेल्या गोष्टींमुळे तिच्या मनात अशा भावना निर्माण होत होत्या. आकर्षण आणि प्रेमातील फरक न समजल्याने तिचे वर्तन धोकादायक वळण घेत होते. दामिनी मार्शलने तिला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग, मन शांत ठेवण्याच्या पद्धती, इंटरनेटपासून योग्य अंतर ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगितले.

पालकांनाही बोलावून परिस्थितीची गंभीरता पटवून देण्यात आली. तात्पुरते शाळेत नियमित येणे थांबवून परीक्षेला बसण्याची संधी देण्याचा मध्यम मार्ग काढण्यात आला. अभ्यास, खेळ आणि सकारात्मक उपक्रमांकडे ऊर्जा वळवण्याचा सल्ला देण्यात आला, तसेच मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी नेण्याची शिफारस करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×