Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पुणे पोलिसांचा नागरिकांना सुखद धक्का

२१ मोबाइल मिळवून दिले

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात नागरिकांकडून प्रवासादरम्यान हरवलेल्या मोबाइलचा पुणे गुन्हे शाखेच्या युनीट दोनने धांडोळा घेतला आहे. अवघ्या महिन्याभरात तब्बल ३ लाख २१ हजारांचे २१ मोबाइल जप्त करीत नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. डिसेंबर २०२५ कालावधीत हरवलेल्या मोबाइलच्या तक्रारीचा पाठपुरावा करीत पोलिसांनी संबंधित मोबाइल परत मिळवून देत तक्रारदारांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले आहे.

मोटारीची काच फोडून लॅपटॉप चोरीला – सविस्तर बातमी

मोबाईल फोन हरवलल्यासह चोरीच्या अनेक तक्रारी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास करण्यात येत होता. युनीट दोनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पेट्रोलिंग दरम्यान डिसेबर २०२५ मध्ये हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सददाम तांबोळी व साधना ताम्हाणे यांनी तांत्रिक विश्लेषन केले. युनीट दोनच्या हददीतील पोलीस ठाण्यातंर्गत गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेतला.

ठिकठिकाणाहुन शोध घेत वेगवेगळया कंपनीचे तब्बल २१ मोबाईल फोन ताब्यात घेतले. मिळून आलेल्या मोबाईल फोनसंदर्भात संबंधितांना संपर्क करुन त्यांना मोबाईल परत देण्यात आले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, एसीपी विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, एपीआय अमोल रसाळ, सददाम तांबोळी, साधना ताम्हाणे, संजय जाधव, शंकर कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, विजय कुमार पवार, संतोष टकले, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओमकार कुंभार, गणेश थोरात, विशाल दळवी, अजीम शेख, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, संदिप शिर्वेâ, विनायक वगारे यांनी केली.

नागरिकांच्या हरविलेल्या मोबाइलसह चोरीला गेलेल्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार तब्बल ३ लाख रूपये किंमतीचे २१ मोबाइल जप्त करीत संबंधितांना माघारी देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य दिसून आले. – संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, युनीट दोन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×