व्याजाच्या पैशाला कंटाळून पतीची आत्महत्या
Marathinews24.com
पुणे – सावकरासोबत पत्नीचे असलेल्या अनैतिक संबंधासह व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून तरूण पतीने पंख्याला दोरी लटकवून गळफास घेतला आहे. याप्रकरणी पत्नीसह सावकराला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. आत्महत्येची घटना १७ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास हडपसरमधील सिद्धीविनायक विहारातील इ-बिल्डींगमध्ये घडली आहे.
मांजरी बुद्रूक परिसरात घरफोडी, ५ लाखांचा ऐवज लंपास – सविस्तर बातमी
सचिन सतीश गिरी (वय ३७ रा. सिद्धीविनायक विहार, हांडेवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी कोमल सचिन गिरी (वय ३०) आणि रवींद्र मारूती मेमाणे (वय ४५ रा. सत्यनारायण कॉलनी फुरसुंगी) याला अटक केली आहे. याप्रकरणी सचिन गिरी यांची बहीण सविता संतोष भारती (वय ३९, रा. उरळी देवाची) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि कोमल यांचे काही वर्षापुर्वी लग्न झाले होते. दोघेही हडपसर परिसरातील हांडेवाडीनजीक इमारतीत राहत होते. त्यावेळी कोमलची आरोपी रवींद्र मेमाणे याच्याशी ओळख झाली होती. त्याचे रूपातंरण मैत्रीण झाल्यानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. दरम्यान, याबाबची काहीही माहिती सचिनला नव्हती. आरोपी रवींद्र हा सचिनच्या घरी येत असल्यामुळे त्यांच्यातही मैत्री झाली. त्यानंतर सचिनने आरोपी रवींद्रकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती. मात्र, काही महिन्यानंतर आरोपीने रक्कम मागण्यास सुरूवात केली. पैशांचा वारंवार तगादा लावल्यामुळे सचिनला मनस्ताप झाला. बायकोच अफेअर आणि सावकाराचा तगाद्याला कंटाळून सचिनने गळफास घेउन आत्महत्या केली. पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करीत आहेत.