पुण्यात ‘ख्रिसमस पार्टी’ करण्याची बतावणी करुन शाळकरी मुलीचा विनयभंग

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

ज्येष्ठ नागरिक अटकेत

marathinews24.com

पुणे – ख्रिसमस पार्टी करण्याची बतावणी करुन १३ वर्षीय शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी कुतबुद्दीन अली महंमद (वय ७२, रा. महंमदवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली. याबाबत शाळकरी मुलीच्या आईने हडपसरमधील काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महंमद हा महंमदवाडीतील एका सोसायटीत राहायला आहे. तक्रारदार महिला याच सोसायटीत राहायला आहे. बुधवारी (२४ डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी ज्येष्ठ नागरिकाने मुलीला त्याच्या घरी बोलावून घेतले. ’ख्रिसमस पार्टी करायला घरी येशील का ? तुला चाॅकलेट देतो’, असे आमिष त्याने मुलीला दाखविले. त्यानंतर मुलीला सदनिकेत बोलावून घेतले. सदनिकेचा दरवाजा बंद करुन त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली.

त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) आरोपीविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करत आहेत.

तरुणीशी अश्लील कृत्य प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

पादचारी तरुणीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका २२ वर्षीय तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी २२ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण करुन शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळी दुचाकीस्वार आरोपीने पादचारी तरुणीशी अश्लील कृत्य केले. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत.

पादचारी महिलेचा विनयभंग

पादचारी महिलेशी अश्लील कृत्य करुन तिला धमकाविल्याप्रकरणी एकाविरुद्ध लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बलराज संदुपटला (रा. संगम वाडा, भवानी पेठ) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिला लष्कर भागात कामाला आहेत. त्या २३ डिसेंबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास कामावरुन घरी निघाल्या होत्या. त्यावेळी आरोपीने महिलेला अडवले. ‘तू चारित्र्यहिन आहे, असे सांगून त्याने महिलेचा विनयभंग केला.“तुझ्या मुलांना खोट्या पोलीस केसमध्ये अडकवतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी महिलेचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. अखेर आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या महिलेने पोलिसंकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस हवालदार धायगुडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×