Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पुण्यात पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पुण्यात महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

दुचाकीस्वार तिघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २४ डिसेंबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कर्वेनगरमधील पोतणीस परिसर रोडवर घडली आहे. याप्रकरणी हनुमानगरात राहणार्‍या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार तिघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुरूवार पेठेत घरफोडी, सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हनुमाननगरात राहायला असून, २४ डिसेंबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास महिला रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी महिलेला पोतणीस रस्ता परिसरात गाठले. त्यांच्या गळ्यातील १ लाख ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी महिलेने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित तपास करीत आहेत.

दुचाकीस्वार चोरटे पुन्हा अ‍ॅक्टीव्ह

दुचाकीस्वार चोरट्यांची टोळी पुन्हा एकदा कार्यरत झाल्याचे मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास रस्त्याने पायी चालणार्‍या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक पोलिसांकडून चोरट्यांना अटकाव करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, चाकरमानी महिला, जेवण केल्यानंतर शतपावली करणार्‍या महिलांनी दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध कारवाईची मागणी पोलिसांकडे केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×