Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुणे ग्रामीण पोलिसांनी नदीत उडी मारून दरोडेखोरांना पकडले

सराफी पेढीवर दरोडा घालणारे जेरबंद; ७० लाखांचे दागिने जप्त

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील पानशेत रस्त्यावरील खानापूरमधील सराफी पेढीवर दरोडा टाकून सव्वा कोटीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ग्रामीाण पोलिसांनी ४८ तासात गुन्हा उघडकीस आणला. चोरट्यांकडून ७० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले. अंकुश दगडू कचरे (वय २०) गणेश भांबु कचरे (वय २३, रा. कात्रज) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींबरोबर असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर – सविस्तर बातमी

पानशेत रस्त्यावरील खानापूर गावात असलेल्या सराफी पेढीवर २६ डिसेंबरला भरदिवसा दरोडा घालण्यात आला होता. चोरट्यांनी कोयता आणि तलवारीच्या धाकाने ऐवज लुटला होता. पसार झालेल्या चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. चोरट्यांना पकडण्यासाठी हवेली आणि ग्रामीाण पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपींची ओळख पटली. पसार झालेले चोरटे पानशेत परिसरातून दुचाकीवरुन राजगड (वेल्हे) तालुक्यात गेल्याची माहिती तपासात मिळाली.

पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस मागावर असल्याचे समजताच आरोपी कचरे आणि अल्पवयीन साथीदार पळाले. दुचाकी रस्त्यात सोडून दिली आणि चोरट्यांनी नदीत उडी मारली. त्यानंतर पोलीस कर्मचारी गणेश धनवे आणि सागर नामदास यांनी नदीत उडी मारली. धनवे हे नदीच्या पलीकडच्या काठावर जाऊन थांबले. चोरटा अंकुश कचरे याची पोहताना दमछाक झाली. कचरेला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कचरे याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून काेयते, तलवारी, दुचाकी, तसेच ७० लाख ३२ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वैशाली पाटील, सहायक निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, किशोर शेवते, महादेव शेलार, उपनिरीक्षक हनुमंतर पासलकर, शीतल ठेंबे, संजय सुतनासे, सुभाष गिरे, दिलीप शिंदे, रामदास बाबर, अमाेल शेडगे, मंगेश थिगळे, मंगेश भगत, तुषार भोईटे, गणेश धनवे, सागर नामदास आणि पथकाने ही कामगिरी केली.

पोलिसांच्या कामागिरीचे कौतुक; पाण्यात उडी मारून आरोपींना पकडले

सराफी पेढीवर दराेडा टाकून पसार झालेल्या चोरट्याने वेल्हे तालुक्यातील नदीत उडी मारली. त्याच्या पाठोपाठ पोलीस कर्मचारी गणेश धनवे, सागर नामदास यांनी पाण्यात उड्या मारल्या. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी केले. अंकुश कचरे याच्याविरुद्ध यापूर्वी तीन गुन्हे दाखल झाले असून कचरे आणि अल्पवयीन साथीदारांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. आरोपींनी दरोडा टाकण्यापूर्वी सराफी पेढीची पाहणी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×