Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

नववर्षानिमित्त लोणावळा परिसरात वाहतूक बदल

पुण्यात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

marathinews24.com

पुणे – नववर्षानिमित्त लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडविण्यासोबत सुरक्षिततेच्यादृष्टीने पर्यटनस्थळ परिसरात ३० डिसेंबरला रात्री १२ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील तीन आयुष आरोग्य संस्थांना राष्ट्रीय एनएबीएच मानांकन – सविस्तर बातमी 

पुणे मुंबई, कामशेतकडे येणाऱ्या वाहने पवनानगर बाजारपेठेत बंदी घालण्यात आली आहे. येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे) कोथुर्णे गाव येथून डावीकडे-कोथुणे,मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली फाटा मार्गे जवन रोडवरुन फांगणे, ठाकुरसाई, खडक गेव्हंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग अशी वाहतूक वळविण्यात येत आहे. परंतु, पवना नगर, कालेगाव, आंबेगाव, शिदगाव, पाले, धामनधरा, दुधीवरे बाजुस जाणारी वाहने तसेच जड, अवजड वाहने सोडण्यात येतील.

येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे)-कोथुर्णे गाव येथून डावीकडे कोथुर्णे,मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राम्हणोलीकडे-वारु फाट्यावरुन पुढे सरळ ब्राम्हणोली एकेरी वाहतुक करण्यात येत आहे. मौजे ब्राम्हणोली, वारु, कोथुर्णे, शिवली येथील स्थानिक रहिवाशांना येळसे बाजुकडे येण्यास बंदी करण्यात आली आहे.

वारु फाटा-ब्राम्हणोली फाटा-पवना नदी पुल-कालेगाव फाटा-पवना बाजारपेठ मार्गे येळसे कामशेत असे जाता येईल. पवनानगर बाजारातपेठेत वाहतूक कोंडी होवू नये म्हणून जड,अवजड वाहनांना जाण्यास बंदी करण्यात येत आहे. १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तुंग, मोरवे, चवसर, जवन, खडक गेव्हडे, ठाकुरसाई, फांगणेकडून पवनानगर, कामशेतकडे जाणारी वाहने काले कॉलनी पवनानगरकडे जाण्यास मनाई करण्यात आली असून ब्राम्हणोली फाटा उजवीकडे-वारु फाटा सरळ-मळवंडी,कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे-कोथुर्णे गाव उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांचे घरापासून डावीकडे येळसेबाजुकडे) येळसे ग्रामपंचायत फाटा मार्गे मुंबई पुणे, कामशेत कडे वळविण्यात येत आहे. परंतु, पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, दुधीवरे बाजूस जाणारी वाहने तसेच जड, अवजड वाहनांना सोडण्यात येईल.

ब्राम्हणोली फाटा उजवीकडे-शिवली (विजय आडकर यांच्या घरापासून डावीकडे येळसे बाजुकडे) येळसे प्रामपंचायत फाटा अशी एकेरी वाहतूक करण्यात येत आहे. वारु ब्राम्हणोली येथील स्थानिक रहिवाश्यांनी पवना नदी पूल-कालेफाटा-पवना बाजारपेठेत येण्यास बंदी करण्यात येत असून, वारु फाटा-मळवंडी, कोथुर्णे फाट्यावरुन डावीकडे कोथुर्णे गावातून पवनानगर बाजारपेठ अशी या पर्यायी मार्गे वळविण्यात येत आहे, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असेही आदेश जारी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×