Breking News
हवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडाGanesh Visarjan Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीरCrop Damage Pune : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणेKatkari Welfare Schemes : ‘लोकसंवाद-२०२६’मधून कातकरी बांधवांना आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहितीपीएमपीएल बसप्रवासात ज्येष्ठ महिलेची बांगडी चोरीलापुण्यात गर्दीत महिलांचे दागिने लांबविलेPune MLC Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २३ ऑक्टोबरलाGender Equality Maharashtra : लिंग समानतेसाठी कालबद्ध कृती आराखडा राबवा

वैमनस्यातून अल्पवयीनावर शस्त्राने वार

टोळक्याची तरुणाला फायटरने मारहाण

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीनासह चौघे ताब्यात

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून अल्पवयीनावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील अंजनीनगर परिसरात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अल्पवयीनासह चौघांना ताब्यात घेण्यात आले. ऋषभ महेश सतवे (वय १७, रा. गंधर्व लाॅनजवळ, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीनासाह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत ऋषभ याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयातून महिलेला बेदम मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ आणि अल्पवयीनात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. ३० डिसेंबर रोजी ऋषभ सायंकाळी सहाच्या सुमारास अंजनीनगर भागातून निघाला होता. त्यावेळी अल्पवयीन आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी त्याला गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ऋषभला तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले. पसार झालेल्या अल्पवयीनासह साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक फिरोज मुलाणी तपास करत आहेत.

हडपसरमधील काळेपडळ परिसरातून तरुणाचे अपहरण करून वैमनस्यातून त्याचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक घटना ३० डिसेंबर रोजी घडली. प्रसाद वीरभद्र देवज्ञे (वय २१, रा. चिखले वाडा, नंदुरवेस गल्ली, परळी, जि. बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी किरण भैरू चव्हाण (वय ३२), रोहित भरत गायकवाड (वय १८, दोघे रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली. आरोपींबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चव्हाण आणि गायकवाड यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीनांकडून गंभीर गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभऱात ७०० हून जास्त अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×