Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुण्यात कसबा पेठेत टोळक्याचा राडा

आम्ही इथले भाई म्हणत केली वाहनांची तोडफोड

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती कसबा पेठेत दुचाकीस्वार चौघा टोळक्याने हातातील शस्त्रे उगारून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यासोबत परिसरातील तीन वाहनांची तोडफोड करून नुकसान केले आहे. ही घटना २९ डिसेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास कागदीपुरात घडली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपींविरूद्ध कारवाई करण्यासाठी मोहिम हाती घेतली. इम्रान शेख (वय ४०, रा. कागदीपुरा, कसबा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पुणे पोलिसांकडून सराईतांविरूद्ध कारवाईची मोहिम – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे टेम्पोमालक असून, ते कसबा पेठेतील कागदीपुरा परिसरात राहायला आहेत.२९ डिसेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. आम्हीच इथले भाई आहेत, अशी घोषणाबाजी करीत तक्रारदाराच्या टेम्पोसह इतर दोघांच्या वाहनांची तोडफोड करीत नुकसान केले. दरम्यान, टोळक्याने हातातील शस्त्रास्त्रे हवेत उगारून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांचा बंदोबस्त तरीही तोडफोड

नववर्षांच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्वाच्या चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, २९ डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळक्याने भाईगिरी करीत नागरिकांना धमकावले. हवेत शस्त्र उगारून आम्हीच इथले भाई आहेत, घराबाहेर निघू नका, असे म्हणत परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण केली. दरम्यान, मध्यवर्ती परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही टोळक्याने वाहन तोडफोडीची हिम्मत कशी केली, अशी विचारणा नागरिकांकडून केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×