Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुणे पोलिसांकडून सराईतांविरूद्ध कारवाईची मोहिम

परिमंडळ सातमधील १६ जण तडीपार, ९ गुंडांची जेलमध्ये रवानगी

marathinews24.com

पुणे – कायदा सुव्यव्यस्थेसह महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईतांविरूद्ध पुणे पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने परिमंडळ एकच्या हद्दीतील ९ गुंडांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर परिमंडळ सातमधील तब्बल १६ जण एकाच दिवशी तडीपार करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

कौटुंबिक वादातून पत्नीच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकला – सविस्तर बातमी

महापालिका निवडणुकीत नागरिकांवर सराईतांचा प्रभाव पडू नये, मतदान प्रक्रियेतील हस्तक्षेप टाळण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईतांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. त्याचअनुषंगाने परिमंडळ एकमधील खडक, डेक्कन, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या ९ आरोपींविरूद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित आरोपींची १४ दिवसांसाठी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी केली आहे.

एकाचवेळी १६ सराईत तडीपार

पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ सातमधील तब्बल १६ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. चंदननगर, वाघोली, लोहगाव, विमानतळ ठाण्याच्या हद्दीत संबंधित सराईतांविरूद्ध विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संबंधितांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी त्यांना तडीपार केले आहे. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आहे.

तडीपार केलेल्या सराईतांची नावे

विठ्ठल गोविंद बिरंग ( रा. रामनगर,वडगाशेरी) चेतन उर्फ आप्पा ग्यानबा देवकुळे (वय २५ रा. वाघोली) यशवंत उर्फ सोन्या पंडीत जाधव (वय २४ रा. वाघाली) गोविंद श्रीमंत सोट (वय २४ रा. केसनंद ) अनिकेत उर्फ चिरक्या विजय थोरात (वय २२ रा. कलवड वस्ती, लोहगाव) माजीद हुसेन शेख (वय २१ रा. लोहगाव) आकाश शरद करंडे (वय ३२ रा. लोहगाव) सुरेश चंद्रभान खंडागळे (वय ३९ रा. विमाननगर) हर्षल दिलीप जगताप (वय २० रा, वडगाव शेरी) करण निवृत्ती तांबे (वय २० रा. चंदननगर) अविनाश भास्कर वाणी (वय २१ रा. खांदवेनगर, वाघोली) पारस सुखदेव जाधव (वय २१ रा. विमाननगर) लक्ष्मण रामा पवार (वय ३९ रा. खराडी ) साहिल सादिक शेख (वय २०, रा. लोहगाव) प्रकाश आनंदा शेट्टी (वय ४८ रा. वाकड) महादेव सुभाष साठे (वय २५ रा. विमाननगर)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×