कौटुंबिक वादातून पत्नीच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकला

बँकेतील आरटीजीएस फॉर्म चोरून फेरफार

कोथरूड पोलिसांकडून पतीविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – कौटुंबिक वादातून एकाने पत्नीच्या चेहऱ्यावर उकळचा चहा टाकल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२३ वर्षीय तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी २७ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैमनस्यातून अल्पवयीनावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचा तरुणीशी वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. आरोपी खासगी ठिकाणी नोकरी करत आहे. तो आणि त्याची पत्नी पौड रस्ता भागात राहायला आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद सुरू होते. बुधवारी (३१ डिसेंबर) सकाळी तक्रारदार तरुणी झाेपली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास तरुणी आणि तिच्या पतीत किरकोळ कारणावरुन वाद झाला. वादातून त्याने तिच्या चेहऱ्यावर उकळता चहा टाकला. या घटनेत तरुणीच्या चेहऱ्याला दुखापत झाली. पोलीस हवालदार एम. जी. दळवी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×