तीन गुन्हे उघडकीस, पावणेतीन लाखांचे दागिने जप्त; वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी
Marathinews24.com
पुणे – दुचाकीवर धुमस्टाईल सुसाट प्रवास करीत महिलांचे दागिने हिसकाविणार्या दोघांना वारजे माळवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी केलेले तीन गुन्हे उघडकीस आणून २ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपींनी वारजे परिसरातील महामार्गालगत सर्विस रोडवर एकट्या दुकट्या महिलेला पाहून दागिने चोरल्याचे उघडकीस आले आहे.
पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा गडचीरोलीत केला खून – सविस्तर बातमी
आकाश आंबादास आंधळे (वय २४ रा. दागंट पाटीलनगर शिवणे) सुजल नरेश वाल्मिकी ( वय २०, रा.दांगट पाटील इस्टेट दुसरी कमान, शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, दुचाकी असा पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. वारजे परिसरात दुचाकीस्वार सोनसाखळी चोरट्यांचा पायबंद घालण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना दिले होते. त्याअनुषंगाने मागील दोन आठवड्यांपासुन पथकाकडून सातत्याने वेगवगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीला गती दिली होती.
माहीतीच्या विश्लेषणातुनच पोलीस अंमलदार निखील तांगडे आणि अमित शेलार यांना संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींची माहिती मिळाली. ते वारजेतील एनडीए मैदानावर असल्याचे उघडकीस येताच, तपास पथकाने धाव घेतली. आरोपी आकाश आंधळे आणि सुजल वाल्मिकी यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, एसीपी भाऊसाहेब पटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश बडाख, उपनिरीक्षक संजय नरळे, संजीव कळंबे, शरद वाकसे, अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे,निखील तांगडे, योगेश वाघ, गोविंद कपाटे, अमित जाधव, गणेश शिंदे यांनी केली आहे.