Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

पुण्यात बालिकेचा खून करुन आईची आत्महत्या

पुण्यात बालिकेचा खून करुन आईची आत्महत्या

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – अस्थि विकाराने ग्रस्त असलेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा आईने दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना वारजे भागात घडली. मुलीचा खून केल्यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शारवी आदिनाथ देवडकर (वय २), तिची आई छाया (वय २८) अशी या दुर्देवी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे. याबाबत आदिनाथ संताराम देवडकर (वय ३०,रा. कारगिल फार्म हाऊसजवळ, गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी छाया देवडकर हिच्या विरुद्ध मुलीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावे बदलीसाठी घेतली ३ लाखांची लाच; आरोग्य सेवक अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ देवडकर, त्यांची पत्नी छाया आणि मुलगी शारवी गोकुळनगर पठार परिसरात राहायला आहेत. शारवीला अस्थिविकार होता. अस्थिविकारावर उपचार सुरू होते. मुलीला झालेल्या अस्थिविकारामुळे छाया नैराश्यात होती. शुक्रवारी (२ जानेवारी) आदिनाथ कामानिमित्त बाहेर पडले. दुपारी दीडच्या सुमारास तो कामावरुन घरी आला. तेव्हा शारवी घरातील पाळण्यात निपचित पडली होती. तिचे हात पाय चिकटपट्टीने बांधण्यात आले होते. पत्नी छायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर घाबरलेल्या आदिनाथ याने पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त जानवे, पोलीस निरीक्षक धेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. शारवीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे तपासणीत उघडकीस आले. त्यानंतर रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक कापसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×