बाणेरमधील बड्या नेत्याच्या मुलाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

Pune Crime

उमेदवाराच्या मुलासह ११ जणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महापालिका निवडणुकीत मतदारांना पैशांचे वाटप केल्याच्या आरोपावरुन बाणेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मुलासह ११ जणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मोक्‍कातील आरोपीची कॅम्‍प परिसरात आत्‍महत्‍या – सविस्तर बातमी

महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बाणेरमधील प्रभाग क्रमांक नऊमध्ये मतदाांना पैशांचे वाटप, तसेच मतदार याद्यांचा गैरवापर केल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवांराकडून करण्यात आला. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचे वाटप करण्यात आल्याची तक्रार प्रभाग क्रमांक नऊमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. त्याानंतर बाणेर पोलिसांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×