मोक्‍कातील आरोपीची कॅम्‍प परिसरात आत्‍महत्‍या

कौटुंबिक छळ अन जादूटोण्यामुळे व्यावसायिकाची आत्महत्या

हडपसरमधील माजी नगरसेवकाचे नावे चिठ्ठी लिहून केली आत्‍महत्‍या

marathinews24.com

पुणे – कुख्यात टिपू पठाण सोबतच्‍या मोक्‍काच्‍या गुन्‍ह्यात पाहीजे असलेल्‍या आरोपीने कॅम्‍पमधील ईस्‍ट स्‍ट्रीट परिसरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. सादीक हुसेन कपुर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्‍महत्‍या करणाऱ्याचे नाव आहे. सादिकने आत्‍महत्‍या करण्यापूर्वी ३३ पांनाची सुसाईड नोट लिहली असून त्‍यामध्ये. हडपसरमधील माजी नगरसेवकाच्‍या नावाचा स्पष्ट उल्‍लेख केला आहे. ही घटना शनिवारी (दि.३) सायंकाळी सहाच्‍या सुमारास उघडकीस आली.

माजी नगरसेवक मंगेश काळोखे खून प्रकरणात पुण्यातून आरोपी अटकेत – सविस्तर बातमी

सादीकचे ईस्‍टस्‍ट्रीट परिसरातील कुमार पॅलेस सोसायटीत २८ क्रमांकाचा गाळा आहे. तेथे त्‍याचे ऑफीस असून, त्याचठिकाणी त्‍याने पंख्याला गळफास घेतला. माहिती मिळाताच लष्कर पोलिसांना घटनास्‍थळी धाव घेतली. सादिकला ससून रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, टिपू पठाण हा हडपसर परिसरातील कुख्यात गुंड असून तो सध्या मोक्‍काच्‍या गुन्‍ह्यात कारागृहात आहे. सादिक याच्‍यावरही मोक्‍का अंतर्गत कारवाई झाली होती. त्‍यामध्ये तो फरार होता. अशातच त्‍याने सुसाईड नोट लिहून आत्‍महत्‍या केल्‍यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्‍यान त्‍याने माजी नगरसेकवाच्‍या नावासह अन्य काही जणांच्‍या नावाचा उल्‍लेख केल्‍याची माहिती आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्‍याच्‍या पडताळणी करण्यास सुरूवात केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×