Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

माजी नगरसेवक मंगेश काळोखे खून प्रकरणात पुण्यातून आरोपी अटकेत

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

वानवडी पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणातील पसार आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली. हडपसरमधील हांडेवाडी भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी काळोखे यांची सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली.

पोलीस निरीक्षक महिलेशी अरेरावी, उमेदवाराच्या भावाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

खालीद खलील कुरेशी (वय २३, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा खून करण्यात आला होता. हडपसरमधील रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकाविण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. याप्रकरणात उमर नूर खान, साहिल हबीब फकीर यांना अटक करण्यात आली होती.

दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा आरोपी खालीद कुरेशी हा गुन्हा करुन पसार झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी खालीद कुरेशीचा शोध सुरू केला. तपासात खालिद हडपसरमधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चैाकशीत खालिदने खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा दोन मित्रांशी संगनमत करुन खून केल्याची कबुली दिली. काळोखे यांचा खून करण्यासाठी त्यांना एकाने सुपारी दिल्याची माहिती दिली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, सर्फराज देशमुख, दया शेगर, महेश गाढवे, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, विठ्ठल चाेरमले यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×