पोलीस निरीक्षक महिलेशी अरेरावी, उमेदवाराच्या भावाविरुद्ध गुन्हा

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात बंदोबस्तास असलेल्या पोलीस निरीक्षक महिलेशी अरेरावी करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी उमेदवाराच्या भावाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात ही घटना घडली. पोलीस निरीक्षक महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शैलेंद्र देवीदास किराड (रा. पद्जी पार्क, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुभव प्रमाणपत्र न दिल्याने कर्मचारी महिलेची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किराड याच्या भावाला एका पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक २२, २३, २४ मधील उमेदवारी अर्ज दाखल करणे, तसेच अन्य कामकाज करण्यात येत आहे. शुक्रवारी (२ जानेवारी) अर्ज माघारी घेण्याची मुदत होती भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या वेळी प्रवेशद्वारावर बंदोबस्तास असलेल्या पोलीस निरीक्षक महिला, तसेच कर्मचाऱ्यांना आरोपीने प्रवेशद्वार उघडण्यास सांगितले. पोलिसांनी नकार दिल्यानंतर आरोपीने प्रवेशद्वाराच्या परिसरात गोंधळ घातला. पोलीस निरीक्षक महिलेला शिवीगाळ करण्यात आली. विनयभंग, तसेच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×