Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

अनुभव प्रमाणपत्र न दिल्याने कर्मचारी महिलेची आत्महत्या

गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविल्याने तरुणाची आत्महत्या

पर्यटन कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पर्यटन कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी महिलेला अनुभव प्रमाणपत्र न देेणे, तसेच तिला देण्यात आलेल्या त्रासामुळे तिने आत्महत्या केली. वर्षभरानंतर याप्रकरणी पर्यटन कंपनीच्या संचालकांविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अश्विनी सचिन जोशी (वय ४६, रा. जोशी अपार्टमेंट, हिंगणे खुर्द) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जीवन जगन्नाथ हेंद्रे (वय ५८, रा. श्रीनिवास क्राॅसओव्हर काऊंटी, लगडमळा, धायरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन जोशी (वय ५१) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ व्यापाऱ्याला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेंद्रे यांची लाईफलाईन टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे. या कंपनीत जोशी २०११ ते २०२४ पर्यंत नोकरीस होत्या. या काळात त्यांनी चार ते पाच वेळा काम सोडले होते. दरम्यान, जोशी यांना कर्वेनगर भागातील एका पर्यटन कंपनीत नोकरी लागली. तेथे त्या रूजू झाल्या. जोशी यांनी हेेंद्रे यांच्याकडे अनुभव प्रमाणपत्र मागितले होते. मात्र, हेंद्रे यांनी त्यांना प्रमाणपत्र दिले नाही. जोशी कर्वेनगरमधील कंपनीत काम करत होत्या. हेंद्रे यांनी संबंधित कंपनीच्या संचालकांची भेट घेऊन जोशी यांना कामावर ठेऊ नका, असे सांगितले होते. त्यानंतर जोशी यांनी कर्वेनगरमधील कंपनीतील नोकरी सोडली. हेंद्रे यांच्या त्रासाला कंटाळून पत्नीने गेल्या वर्षी ८ फेब्रुवारीला आत्महत्या केली, अशी फिर्याद जोशी यांचे पती सचिन यांनी नुकतीच पोलिसांकडे दिली. त्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हेंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×