किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ व्यापाऱ्याला बेदम मारहाण

किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ व्यापाऱ्याला बेदम मारहाण

खडक पोलिसांनी दोघांंविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवार पेठेतील कस्तुरे चौकात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिनेश गोमाजी गांधी (वय ६०, रा. एकबोटे काॅलनी, घोरपडे पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत गांधी यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यात पादचारी तरुणाला लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी यांचे गुरुवार पेठेतील कस्तुरे चाैकात दुकान आहे. शुक्रवारी (२ जानेवारी) गांधी दुपारी साडेचारच्या सुमारास दुकान बंद करुन कामानिमित्त बाहेर पडले. त्यावेळी समोरुन दोन तरुण आले. त्यांनी गांधी यांना धक्का दिला. त्यावेळी गांधी यांनी धक्का का दिला ? अशी विचारणा केली. या कारणावरुन दोघांनी गांधी यांना शिवीगाळ केली. गांधी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने त्यांच्या डोक्यात हातातील कडे मारले, तसेच रस्त्यात पडलेल्या बांबूने एका आरोपीने त्यांना मारहाण केली. मारहाणीत गांधी यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी कस्तुरे चौक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले, असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक बनकर तपास करत आहेत.

तरुणीला धमकावून बलात्कार करणारा गजाआड

तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. क्रिश मनोहरलाल राणा (वय १९, रा. गोखलेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राणा आणि तरुणीची ओळख झाली होती. त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक भांडवलकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×