कोंढव्यात पादचारी तरुणाला लुटले

अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी कोंढवा पोलिसांची तत्परता

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कोंढव्यात पादचारी तरुणाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात बालिकेचा खून करुन आईची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कोंढव्यातील मीठानगर भागात राहायला आहे. तो गुरुवारी (३१ डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास कोंढव्यातून निघाला होता. एका मिठाई विक्री दुकानाजवळ चोरट्याने त्याला धक्का दिला. तक्रारदार तरुण रस्त्यात पडला. त्यानंतर तरुणाला धमकावून चोरट्याने त्याच्याकडील ३० हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. चोरट्याने तरुणाच्या बँक खात्यातून १० हजार रुपये काढून घेतले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×