Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक

फेसबुकद्वारे पाठवली लिंक, जेष्ठाला ३७ लाखांचा गंडा

खडक पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – व्यावसायासाठी बँकेकडून कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खडक पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आदित्य मोहन रेळेकर (वय ३४, रा. धनकवडे पाटील टाऊनशिप, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), करण विजय इजंतकर (वय ३२, रा. मेट्रो ग्रीन सोसायटी,टिळेकरनगर, कात्रज-काेंढवा रस्ता), श्रीनिवास पांडुरंग बकरे (वय ४७, रा. गुलाबनगर, धनकवडी, मूळ रा. देवाळी, ता. माणगाव, जि. रायगड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहे. याबाबत व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिवाजीनगरमध्ये मंदिरातून चांदीचा मुकुट चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. ते मार्केट यार्ड भागात राहायला असून, शुक्रवार पेठेत त्यांचे दुकान आहे. आरोपींशी त्यांची गेल्या वर्षी ओळख झाली होती. त्या वेळी आरोपींनी बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, असे आमिष त्यांना दाखविले होते. चोरट्यांनी त्यांच्याकडून कर्ज मंजुरी, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी ५१लाख रुपये घेतले. त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×