लग्नाचे आमिष दाखवून विधवेवर लैंगिक अत्याचार

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार

सोशल मीडियावर झाली होती ओळख

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बीडच्या केज तालुक्यातील गावात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यापही फरार आहे.

‘मोक्का’ कारवाईतील फरार गुन्हेगाराची आत्महत्या – सविस्तर बातमी

पीडित महिला मुलांसह केज तालुक्यातील सासरी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती. दोन वर्षांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवरून रमाकांत तांदळे (वय ३०) या तरुणाशी ओळख झाली. ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी सहमतीने शारीरिक संबंध ठेवले. मात्र, १४ ऑगस्ट २०२५ रोजी आरोपीने पीडिते ऐवजी दुसऱ्या तरुणीशी गुपचूप विवाह केला. त्यानंतरही ३१ डिसेंबर २०२५ रोजी पीडित महिला घरात एकटी असताना आरोपीने जबरदस्तीने घरात प्रवेश करून तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी रमाकांत तांदळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१), ११५(२), ३३३, ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक प्रकाश शेळके करीत असून आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथके शोध घेत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×