Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

‘मोक्का’ कारवाईतील फरार गुन्हेगाराची आत्महत्या

‘मोक्का’ कारवाईतील फरार गुन्हेगाराची आत्महत्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात गुंड टिपू पठाण टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराने लष्कर भागात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) हडपसरमधील माजी नगरसेवकासह अन्य काही जणांची नावे आढळली. माजी नगरसेवकाने फरार आरोपीकडे ५० लाख रुपये मागितले होते. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडे तक्रारीची धमकी दिल्याने तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या – सविस्तर बातमी 

सादिक हुसेन कपूर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फारुक यासीन इनामदार, अफान फारुक इनामदार, जहूर महंमद सय्यद (तिघे रा. सय्यदनगर, हडपसर), तन्वीर इब्राहिम मणीयार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबबात कपूर यांचा मुलगा साजीद (वय २७, रा. ख्वाजा मंझिल, सय्यदनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर याचे लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील कुमार पॅलेस सोसायटीत कार्यालय आहे. कपूर जमीन खरेदी विक्री व्यवसाय करायचा. शनिवारी सायंकाळी त्याने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेच माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.

सादिक कपूर याने आत्महत्या करण्यापूर्वी ३० ते ३५ पानी चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली. ‘माजी नगरसेवकाने त्याच्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा, साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली’, अशी फिर्याद सादिक कपूर यांचा मुलगा साजीद याने दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सय्यदनगर परिसरात टिपू पठाण याची दहशत आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पठाण याच्या टोळीचा सादिक हा सदस्य होता. त्याच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आल्यानंतर तो पसार झाला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×