Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पोलिसांकडे तक्रारीची धमकी दिल्याने तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

पोलिसांकडे तक्रारीची धमकी दिल्याने तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा

marathinews24.com

पुणे – पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिल्याने तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांसह ७ जणांविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

रामदास भरत पवार (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रृती कन्हेरे, ऋषी कन्हेरे, मोहन सोनार (सर्व रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबबात पवार यांची बहीण रुपाली संतोष पुजारी (वय ३३, रा. बाळासाहेबनगर, लोणंद, जि. सातारा)यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास पवार हे कोंढव्यातील येवलेवाडी भागात असलेल्या शीतल ग्लॅमअप युनिसेक्स सलून येथे कारागीर म्हणून काम करत होते. सलूनची मालकीण शीतल काळे हिच्याशी त्यांचा वाद झाला होता. आरोपींनी पवार यांना पोलिसांकडे तक्रार करतो, अशी धमकी दिली होती. तक्रार न देण्यासाठी पवार यांच्याकडे आरोपींनी पाच लाख रुपये मागितले होते. आरोपींनी दिलेल्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. आरोपी त्रास देत असल्याची माहिती त्यांनी बहिणीला दिली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी वही, तसेच समाजमाध्यमात आरोपींच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले होते. ३० डिसेंबर रोजी त्यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली. पवार यांच्या बहिणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×