फ्लॅटमध्ये शिरून चाकूच्या धाकाने तरुणीला लुटले

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा

कोरेगाव पार्कातील घटना

marathinews24.com

पुणे – फ्लॅटमध्ये शिरून चोरट्यांनी तरुणीला चाकूचा धाक दाखवून ११ लाख ५० हजार रुपयांचे दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना कोरेगाव पार्क भागात घडली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत तरुणी जखमी झाली. याबाबत एका तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक पाच येथील सोसायटीत राहायला आहे. रविवारी (४ डिसेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा वाजविला. तरुणीने दरवाजा उघडताच चोरटे आत शिरले. चोरट्यानी तरुणीला चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर चोरट्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी देऊन शयनगृहातील कपाट उघडण्यास सांगितले. चोरट्यांनी कपाटातील ११ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर तरुणीने चोरट्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी तिला मारहाण केली. घाबरलेल्या तरुणीला धमकावून चोरटे पसार झाले. तरुणीने त्वरीत घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, परिमंडळ पाचच्या उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×