Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

पुण्यातील सदाशिव पेठेत ज्येष्ठ नागरिकाला धमकावून लुटले

तुळशीबागेत महिलांकडील दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्यांच्याकडील सोन्याची अंगठी, रोकड असा ऐवज लुटून नेल्याची घटना सदाशिव पेठेतील लिमयेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांचे वय अंदाजे १८ ते २० दरम्यान असल्याचे ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

फ्लॅटमध्ये शिरून चाकूच्या धाकाने तरुणीला लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कर्वे रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. रविवारी (४ जानेवारी) सकाळी पावणेनऊच्या सुमारास ते सदाशिव पेठेतील लिमयेवाडीतून निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्यांचे चेहरे झाकले होते. एका चाेरट्याने त्याच्या कंबरेला शस्त्र असल्याचे भासविले. ज्येष्ठ नागरिकाला धमकावून चोरट्यांनी त्यांच्याकडील रोकड, तसेच सोन्याची अंगठी असा ४२ हजार रुपयांचा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसंनी लिमयेवाडी ते टिळक रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक निरीक्षक उसगावकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×