पुण्याच्या जडणघडणीतील दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपले – मंत्री चंद्रकांत पाटील

पुण्याच्या जडणघडणीतील दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व काळाच्या पडद्याआड

marathinews24.com

पुणे – शहराचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी (दि.६) निधन झाले. त्यांनी केलेल्या कामाचा मंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी गुणगौरव केला. कोथरुड येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. पुण्याच्या सामाजिक आणि सार्वजनिक जडणघडणीत सुरेश कलमाडी यांचे योगदान महत्त्वाचे होते. ‘पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सांस्कृतिक वैभवात त्यांनी भर घातली. अशा शब्दांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन – सविस्तर बातमी

बालेवाडी क्रीडा संकुलाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीतील दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्यावतीने शहर कार्यालयात सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×