Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

मुलीशी अश्लील कृत्य करणारा रखवालदार गजाआड

मुलीशी अश्लील कृत्य करणारा रखवालदार गजाआड

पीडित मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात दिली होती तक्रार

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या मुलीशी रखवालदाराने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी रखवालदाराला अटक केली. अरविंद अरुण तिवारी (रा. सतना, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या रखवालदाराचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची १७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वाघोलीतील एका सोसायटीत राहायला आहे. आरोपी तिवारी हा सोसायटीत रखवालदार आहे. गुरुवारी (८ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित मुलगी सोसायटीच्या आवारात खेळत होती. त्यावेळी तिवारीने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. त्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी रखवालदार तिवारी याला जाब विचारला. तिवारी याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तिवारी याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून प्रतिबंध संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×