बॉयफ्रेंडच्या खोलीचे थकीत भाडे भरण्यासाठी काकांच्या घरात चोरी

कल्याणीनगरमधील घटना; तिघे अटकेत

marathinews24.com

पुणे – शहरातील कल्याणीनगर भागात भरदिवसा सदनिकेत शिरून लूटमार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला. गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासात आरोपींना अटक करण्यात आली. एका अल्पवयीन युवतीने मित्राचे थकलेले घरभाडे भरण्यासाठी काकाच्या घरी लूटमार करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. यश मोहन कुर्हाडे (वय २०, रा. केसनंद), वृषभ प्रदिप सिंग (वय २१, रा. चऱ्होली, आळंदी रस्ता), प्राज विवेक भैरामडगीकर (वय १८, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आवादा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्याचा संताप – सविस्तर बातमी

तक्रारदार महिला आणि तिचे पती कल्याणीनगर भागात राहायला आहेत. ५ जानेवारीला दुपारी सव्वाचारच्या सुमारास महिला सदनिकेत होती. त्यावेळी चेहरा झाकलेले दोघे जण सदनिकेत शिरले. त्यांच्याकडे सुरी, दोरी होती. महिलेने दोघांना पाहिल्यानंतर सदनिकेचा दरवाजा लावून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. सोसायटीतील रहिवाशी आरडाओरडा ऐकून तेथे जमा झाले. रहिवाशी जमा झाल्याचे पाहताच दोघे जण पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे पोहोचले.

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. एकजण सोसायटीच्या परिसरात थांबल्याचे आढळून आले होते. त्याने चेहरा झाकला होता. पोलिसांनी चौकशी सुरु केली. घटना घडली तेव्हा महिलेची पुतणी तेथे होती. पोलिसांनी अल्पवयीन पुतणीची चौकशी केली. घरात लुटमारीचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. त्यानंतर महिलेची पुतणी तेथून निघाली. पोलिसांना संशय आल्याने तिची चौकशी केली. तेव्हा माझा मित्र भेटायला आला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पुतणीची चौकशी केली. चौकशीत तिने दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली.

पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत पुतणीने मित्राचे घरभाडे थकल्याने काकूच्या घरात लूटमार करण्याचा कट रचल्याचे उघड झाले. त्यानंतर पुतणीने साथीदारांची माहिती दिली. काकूने आरडाओराडा केल्याने मित्र आणि साथीदार तेथून पसार झाल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिघांना अटक केली. ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे उपायुक्त चिलूमला रजनीकांत, सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, विजय ठाकर, उपनिरीक्षक महेश फटांगरे, प्रदीप सुर्वे, पोलीस कर्मचारी नटराज सुतार, संदीप जायभाय, गणेश पालवे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे यांंनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×