औंध परिसरात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा

चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन हजारांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून २२ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २ ते ६ जानेवारीला औंधमधील पाया हौसिंग सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थकीत घरभाडे भरण्यासाठी काकाच्या घरी लूटमारीच्या प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे औंधगावात राहायला असून, त्यांचा पाया सोसायटीत फ्लॅट आहे. २ ते ६ जानेवारीला त्यांचा फ्लॅट बंद होता. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील तीन हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने मिळून २२ हजारांचा ऐवज चोरून नेला. गावाहून आल्यानंतर तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार दांगडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×