शेअर ट्रेडींगद्वारे परताव्याचे आमिष पडले २८ लाखांना

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची १२ कोटींची फसवणूक

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींग कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल २८ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २५ ऑक्टोबर ते ८ डिसेंबर २०२५ कालावधीत वाघोलीत घडली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय नागरिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औंध परिसरात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीत राहायलास असून, २५ ऑक्टोबरला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादित केल्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. २८ लाखांची रक्कम वर्ग करून घेत त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करीत आहेत.

आमिषाने तरूणाला ९ लाखांचा गंडा

शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी मांजरी परिसरातील तरूणाला ९ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १ ते २८ ऑगस्ट २०२५ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ४० वर्षीय तरूणाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×