८ गुन्हे उघडकीस, पावणे नऊ लाखांचा ऐवज जप्त; युनिट सहाची कामगिरी
पुणे – पोलीस असल्याची बतावणी करीत शहरातील विविध भागात राहणाऱ्या जेष्ठांना गंडावून त्यांच्याकडील ऐवजाची लूट करणाऱ्या सराईतला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल ८ गुन्ह्यांची उघड करीत ८ लाख ६८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. हमीद अफसर खान ( वय ३० रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर,पुणे) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.
अखेर डॉ. सुशृत घैसास यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
जेष्ठ नागरिकांना अडवून त्यांना पोलीस असल्याची बतावणी करीत लूटमारीचे गुन्हे वाढीस लागते होते. त्यापार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंधक व गुन्हे उघडकीस आणणेकामी युनिट ६ कडुन प्रयत्न सुरु होते. पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले यांना पोलीस असल्याची बतावणी करुन वयोवृध्द पुरुष आणि महिलांना लुटणारा लोणी काळभोर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला मोटार सायकलसह लोणीकाळभोरमधील स्मशानभुमीजवळ ताब्यात घेतले.
आरोपीला गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये आणून त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने महिलांसह काही नागरिकांच्या दुर्बलतेचा फायदा घेवुन दागिणे चोरल्याची कबुली दिली. त्याने साथीदारसह पुणे शहर व आजुबाजुच्या परिसरामध्ये हातचलाखीने फसवणुक करुन चोरी केली आहे. त्याच्याकडून कोंढवा, पर्वती, सिंहगड रोड, कोथरूड, भारती विद्यापीठ, सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या केल्याचे सांगितले.ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, अमंलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती नरवडे, यांनी केली आहे.
तब्बल एवढा केला ऐवज जप्त
आरोपीकडून पोलिसांनी ८ गुन्ह्यातील ७ लाख ६८ हजारांचे ९६ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ लाख रुपयांची दुचाकी जप्त केली आहे. त्याने हातचलाखी करुन ८ फसवणुकीचे गुन्हे केले आहेत. आरोपीकडुन एकुण ८ लाख ६८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.