Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

एमडीला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टरांची फसवणूक

एमडीला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टरांची फसवणूक

आरोपीला केज पोलिसांनी कराडमधून केली अटक

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – वैद्यकीय शिक्षणासाठी ‘एमडी’ला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने वैद्यकीय अधिकाऱ्याची ८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला केज पोलिसांनी कराड बेड्या ठोकल्या आहेत . सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश रामचंद्र तोंडे (वय २७, रा. सोनीमोहा, ता. धारूर) यांनी धारूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांकडून कागदोपत्री पडताळणी; कोणतीही जप्ती नाही- नरेश अरोरा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश तोंडे हे बारामती येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना फेसबुकच्या माध्यमातून त्यांची ओळख सौरभ कुलकर्णी याच्याशी झाली. तोंडे यांना एमडी मेडिसिनसाठी प्रवेश घ्यायचा असल्याने आरोपी कुलकर्णीने त्यांना वर्ध्याच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये ६५ लाख रुपयांत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याने २० ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ८ लाख रुपये रोख आणि ऑनलाईन स्वरूपात घेतले. मात्र, कोणत्याही यादीत नाव न आल्याने आणि कुलकर्णीने पैसे परत करण्यास नकार दिल्याने तोंडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम खाझड यांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला. आरोपी कुलकर्णी याने नाशिक, सोलापूर, जालना, नागपूर, पुणे, मुंबईसह गुजरात आणि पंजाब राज्यात अशाच प्रकारे तब्बल १५ ठिकाणी ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केज पोलिसांच्या पथकाने त्याला सातारा जिल्ह्यातील कराड येथून १३ जानेवारीला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी वेंकटराम खाझड, जावेद कराडकर, अमिर ईनामदार आणि मंदे यांच्या पथकाने केली. कारवाईमुळे केज पोलीसांचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. आरोपीकडून आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×