नागपुरात अग्निसुरक्षेसाठी जनतेचा जोरदार प्रतिसाद
marathinews24.com
नागपूर- अग्निशमन सेवा सप्ताह 2025′ निमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपात्कालिन सेवा विभागातर्फे शनिवारी (ता.19) ‘अग्निसुरक्षा जनजागृती’ रॅली काढण्यात आली. महानगरपालिका मुख्यालयाजवळील बिशप कॉटन शाळेपासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅलीला राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक नागेश शिंगणे यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली शहरातील विविध भागात फिरुन आल्यानंतर संविधान चौकात समाप्त झाली. यावेळी विभागीय अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी सतीश राहाटे, तुषार बारहाते, सुनील डोकरे, प्रकाश कावळकर, भगवान वाघ उपस्थित होते.