चूलत भावाच्या हत्या प्रकरणी आरोपीला जन्मठेप

चूलत भावाच्या हत्या प्रकरणी आरोपीला जन्मठेप

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – अल्पवयीन ९ वर्षांच्या सख्ख्या चुलत भावाचा गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीला अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेतातील पाईप लाईन आणि किरकोळ वादातून ही घटना १५ डिसेंबर २०१८ रोजी परळी तालुक्यातील चांदपूर येथे घडली होती. संबंधित गाजलेल्या प्रकारणात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बाळासाहेब माणिकराव लोमटे यांनी बाजू मांडलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे आरोपीला शिक्षा पाञतेसाठी निर्णयदायक ठरले आहेत.अनिकेत गित्ते असे हत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

केज पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

अल्पवयीन अनिकेत गित्ते याचे कुटुंबीय आणि आरोपी अतुल गित्ते यांचे कुटुंब गावात वास्तव्यास असून त्यांची शेती एकमेका शेजारी आहे. शेतातील पाणी देण्याची पाईप लाईन सामायिक असल्याने त्यांच्यात वारंवार वाद घडत होते. वादाचे रूपांतर भांडणात होऊन आरोपींनी कट रचून अनिकेतचा दोरीने गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चिमुरड्याचा मृतदेह घरातील पाण्याच्या हौदात उभा करून ठेवला होता. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर हे प्रकरण अंबाजोगाई सत्र न्यायालयात सुरू झाले.

जिल्हा व सत्र न्यायाधीश रचना रमेशसिंह तेहरा यांच्यापुढे खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बाळासाहेब लोमटे यांनी १२ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, इतर साक्षीदार आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने मुख्य आरोपी अतुल गित्ते याला दोषी ठरवत जन्मठेप व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याबद्दल रवी वैजनाथ गिते (वय २४), वैजनाथ रंगनाथ गिते (वय ५०) आणि आशाबाई वैजनाथ गिते (वय ४५) या तिघांना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संवेदनशील प्रकरणात सरकारी अभियोक्ता बाळासाहेब लोमटे यांना ऑड. शिवाजी व्यंकटराव मुंडे यांनी सहकार्य केले, तर कोर्ट पैरवीचे काम मंगल मंचकराव दुनघव यांनी बजावले. गुन्ह्याच्या तपासात पोलीस उपनिरीक्षक डी. आर. वाघमारे आणि परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक एम.ए. सय्यद यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×