Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विवाहाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

कोंंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार करणाऱ्या एकाविरुद्ध कोंंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी गणेश पिल्ले (वय १९, रा. चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका युवतीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कंपनीतून सव्वा तीन लाखांचे साहित्य चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १७ वर्षीय युवती आणि आरोपीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. पिल्ले याने युवतीला विवाहाचे आमिष दाखविले. तिच्यावर त्याने बलात्कार केला. युवतीने त्याला विरोध केला. पिल्ले याने युवतीला धमकावले. घाबरलेल्या युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे तपास करत आहेत.

महिलेचा विनयभंग करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

पुणे-मुलीची छेड काढल्याने विचारणा करणाऱ्या महिलेला धक्काबुक्की करुन तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैभव घाटोळे (रा. टिळेकनगर, कोंढवा बुद्रुक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या दोन मुलींकडे पाहून आरोपी घाटोळे शिट्टी वाजवायचा. महिलेने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने महिलेला धक्काबुक्की करुन विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद जाधव तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण करणारा अटकेत

पुणे- एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण करुन तिचा विनयभंग करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. याबाबत एका तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी समीर अकबर हाश्मी (वय २५, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १९ वर्षीय तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी हाश्मी तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीने त्याला नकार दिल्यानंतर तो चिडला. आरोपी तरुणीच्या घरात शिरला. तू माझ्यावर प्रेम केले नाही तर तुला शिक्षण घेऊ देणार नाही, अशी धमकी त्याने तिला दिली. तरुणीने त्याला धक्का दिल्यनो तो चिडला. त्याने तरुणीला मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×