Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

Pune : कंपनीतून सव्वा तीन लाखांचे साहित्य चोरीला

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

नांदेडसिटी परिसरातील सुरबिल्डींगमध्ये घडली घटना

marathinews24.com

पुणे – कंपनीतून ३ लाख ३६ हजारांचे साहित्य चोरून नेणार्‍याला नांदेडसिटी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ८ ते ११ जानेवारीला नांदेडसिटी परिसरातील सुरबिल्डींगमध्ये घडली आहे. व्यासमुनी श्यामनैन पाल वय २६ रा. उत्तमनगर, मूळ- उत्तर प्रदेश असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एकाने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बीडमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा आगडोंब – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे संबंधित कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला आहेत. त्यांच्या कंपनीतील व्यासमुनी पाल याने ८ ते ११ जानेवारी कालावधीत स्टेनलेस स्टील धातुचे ९६ फायर ट्रीपल पर्पज नोजल चोरून नेले आहे. त्याची किंमत ३ लाख ३६ हजार रूपये आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमृता पाटील तपास करीत आहेत.

मूळ डिमांड ड्राफ्ट न देता फसवणूक

बँकेत मूळ डिमांड ड्राफ्ट न देता दुसरा ड्राफ्ट देउन एकाने १ लाख ३० हजार रूपयांची बँकेची फसवणूक केली आहे. ही घटना १२ जानेवारीला सकाळी दहाच्या सुमारास दीपबंगला चौकात घडली आहे. याप्रकरणी पैâयाज रियाज पठाण याच्याविरूद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपप्रबंधक मंगेश ढोले यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ढोले हे दीपबंगला चौकातील एचडीएफसी बँकेत उपप्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. १२ जानेवारीला ते बँकेत कार्यरत असताना आरोपी पैâयाजने मूळ डिमांड ड्राफ्ट न देता दुसराच ड्राफ्ट बँकेत जमा केला. त्यानंतर तो ड्राफ्ट वटवून १ लाख ३० हजार रूपयांची बँकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×