Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

बीडमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा आगडोंब

२३ वर्षीय विवाहितेला लोखंडी गजाचे दिले चटके

marathinews24.com

बीड – जिल्ह्यातील बर्दापूर येथे मुलांच्या भांडणातून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर भीषण हिंसाचारात झाल्याची घटना दि १२ जानेवारीला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळींनी क्रूर वागणूक दिल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

धनकवडीत घरफोडी; १ लाखांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी

अश्विनी घरात कपडे धुवत असताना तिचा मुलगा शिवांश आणि दीराचा मुलगा सुरज यांच्यात किरकोळ वाद झाला होता. यावेळी सासरा मोहन साधू मोरे याने शिवांशला मारहाण करण्यास सुरुवात केली. अश्विनीने मुलाला का मारता असे विचारले असता, पती शहाजी मोहन मोरे याने तिला अर्वाच्च भाषेत बोलून मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी सासू विजयमाला मोहन मोरे हिने गरम केलेला लोखंडी गजाचा तुकडा आणून तिच्या मुलाच्या हातात दिला. पतीने तापलेल्या गजाने अश्विनीच्या डाव्या हाताच्या पोटरीवर आणि हातावर पाच ठिकाणी चटके दिले. ‘हिला उभी पेटवून द्या’ असे चिथावणीखोर वक्तव्य सासऱ्याने केल्याचे तक्रारीत आरोप केला आहे.

जखमी अवस्थेत अश्विनीला उपचारासाठी जाऊ दिले जात नव्हते, अखेर तिने वडिलांना फोन करून बोलावून घेतले. अंबाजोगाई येथे उपचार घेतल्यानंतर तिने बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सासरच्या मंडळीं विरोधात बर्दापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८, ११५(२), ३५१(२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समाधान भाजीभाकरे हे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×