अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाला हटकल्याने ज्येष्ठाला मारहाण

खराडी, हडपसरमध्ये फ्लॅटमधून लॅपटॉप चोरीला

तरुणाविरुद्ध वाघोली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या आवारात अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाला हटकल्याने ज्येष्ठाला मारहाण करण्यात आल्याची घटना वाघोली परीसरात घडली. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध वाघोली पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका तरणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाहाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे वाघोलीतील एका सोसायटीत राहायला आहेत. शुक्रवारी (१६ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या आवारातून निघाले होते. सोसायटीच्या परिसरात आरोपी आणि त्याची मैत्रीण थांबली होती. दोघे जण अश्लील चाळे करत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाने पाहिले. ज्येष्ठ नागरिकाने आरोपी तरुणाला हटकले. सोसायटीच्या परिसरात अश्लील चाळे करु नका, असे ज्येष्ठ नागरिकाने तरुणाला सांगितले.

या कारणावरुन तरुणाने त्यांना शिवीगाळ केली. काही वेळानंतर तरुणाने सोसायटीच्या आवारात प्रवेश केला. ज्येष्ठाला शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यात हातातील लोखंडी कडे मारले. ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्याला दुखापत झाली. पसार आलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×