शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

येरवडा, हडपसर भागात अपघात

marathinews24.com

पुणे- शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात दोघांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली. हडपसर आणि येरवडा भागात अपघाताच्या घटना घडल्या. येरवड्यातील सादलबाबा दर्गा रस्त्यावर भरधाव टेम्पोने पदपथावर शिरल्याने एकाचा मृत्यू झाला. भरधाव टेम्पोने वाहनांना धडक दिली. याप्रकरणी टेम्पो चालकाला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली. सुशील निवृत्ती मोहिते (वय ४०, रा. चांदणी चौक, जयजवानगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालक आदम चाँद शेख (वय ६२, रा. लोहियानगर, महात्मा फुले पेठ) याला अटक करण्यात आली. अक्रम सलीम मुलाणी (वय २५, रा. कागदीपुरा, कसबा पेठ) याने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धक्कादायक बेपता जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलाणी रिक्षाचालक आहे. १७ जानेवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास रिक्षाचालक मुलाणी सादलबाबा दर्गा रस्त्यावरुन निघाला होता. त्या वेळी तेथून निघालेल्या भरधाव टेम्पोने रिक्षाला धडक दिली. त्यानंतर भरधाव टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पदपथावर शिरला. तेथे थांबलेले सुशील मोहिते यांना धडक दिली, तसेच पदपथावरील दुचाकी वाहनांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोहिते यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. टेम्पो चालक शेख याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

पुणे-सोलापूर रस्त्यावर मांजरी परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०, रा. महादेवनगर, मांजरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शेळके याचा मित्र मनोहर अण्णा रणशिंग (वय १९, रा. महादेवनगर, मांजरी) याने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी खासगी बस चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रणशिंग याच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने रणशिंग आणि मित्र शेळके हे पेट्रोल पंपावर १७ जानेवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास निघाले होते. मांजरी परिसरातील पेट्रोल पंप बंद असल्याने दुचाकीस्वार शेळके याने दुचाकी वळवली. त्या वेळी भरधाव वेगात निघालेल्या बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात शेळके आणि सहप्रवासी रणशिंग हे जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या शेळके याचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×