Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक

फेसबुकद्वारे पाठवली लिंक, जेष्ठाला ३७ लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – काळ्या पैसे व्यवहारात कारवाईची भीती दाखवून महिलेची सायबर चोरट्यांनी ४ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत ४८ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल चोरणाऱ्या अल्पवयीनाला पकडले; ४ मोबाइल जप्त – सविस्तर बातमी

तक्रारदार महिला कोंढवा भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर डिसेंबर महिन्यात संपर्क साधला होता. काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून चोरट्यांनी महिलेला अटक टाळण्यासाटी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सीबीआय अशा तपास यंत्रणांकडून कारवाईची भीती दाखवून चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×