अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
marathinews24.com
नागपूर – महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण रविवारी (ता. २०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हैदराबाद हाऊसमध्ये अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाला विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, बोधचिन्हाचे रचनाकार विवेक रानडे उपस्थित होते.