कामगारांना लुटणार्‍या टोळीला दोन तासात अटक

६ मोबाइल, दुचाकी जप्त; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पायी जाणार्‍या कामगारांना अडवून लुट करणार्‍या त्रिकुटाला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड लाखांचे सहा मोबाइल, दुचाकी जप्त करीत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. निलेश चंद्रकांत पवार (वय २८ रा. भोंद्रे कान्हुर ता पारणेर जि अहिल्यानगर ) मोहन विठ्ठल भोगे (वय – २८ रा. प्रितम प्रकाशनगर शिरुर) अभिजीत चंद्रकांत पवार (वय- ३५ रा. हिवरगावपठार ता संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

बीडच्या ऊसतोड मजुराची साताऱ्यात हत्या – सविस्तर बातमी

तक्रारदार सुरेश गलाबाई पारगील (रा. पाचामोडी ता सांगावाडा जि म्हैसाघर गुजरात) हे १४ जानेवारीला पायी जात होते. त्यावेळी तीन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. दमदाटी करुन त्यांच्याजवळील मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकाला सूचना करीत आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर यांना कौशल्यपूर्वक तपास केला.

गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन फिर्यादीने दिलेल्या वर्णनाप्रमाणे परिसरात तपास केला. ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५ मोबाईल, दुचाकी असा ऐवज जप्त केला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे उपनिरिक्षक अविनाश थोरात यांनी केली आहे. गुन्हयाचा तपास सहायक फौज शिंदे, हवा सरजीने करीत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×