Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

‘बजाज पुणे ग्रँड टूर’ च्या अंतिम टप्प्याचे २३ जानेवारी रोजी आयोजन

बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर असा ९९.१५ किमीचा थरारक प्रवास

marathinews24.com

पुणे – ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’अंतर्गत शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी अंतिम टप्प्याचे बालेवाडी ते बाल गंधर्व रंगमंदिर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेची सुरुवात दुपारी १ वाजून ३० वाजता श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी येथून होणार असून जंगली महाराज रोडवरील बाल गंधर्व रंगमंदिर येथे शेवट होणार आहे.

सायकलपटूच्या आरोग्य व सुरक्षिततेच्यादृष्टीने युसीआयच्या मानकांनुसार सुसज्ज वैद्यकीय सुविधा – सविस्तर बातमी

प्रशासनाने वाहतुकीच्या अनुषंगाने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करुन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

या अंतिम टप्प्यात श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी ते जंगली महाराज रोडवरील बाल गंधर्व रंगमंदिर या दरम्यान स्पर्धा होणार असून या स्पर्धेची एकूण ९९.१५ किलोमीटर आहे. यामध्ये नागरिकांना देश-विदेशातील सायकलपटूचे कौशल्य बघण्याची संधी मिळणार असल्याने अधिकाधिक नागरिकांनी स्पर्धा बघण्याकरिता यावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

असा असेल स्पर्धेचा टप्पा-४

श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे, बालेवाडी येथून स्पर्धेला प्रारंभ होऊन ती पुढे पाषाण, एनसीएल मैदान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, राजीव गांधी ब्रिज, रक्षक चौक, काळेवाडी चौक, डांगे चौक, संत तुकाराम महाराज ब्रिज, स्वामी विवेकानंद चौक, भक्ती शक्ती चौक, त्रिवेणी नगर चौक, केसबी चौक, टाटा सर्कल, इंद्रायणी चौक, पीसीएनटीडीए चौक, स्पाईन रोड, सिल्वर वाटी चौक, केसबी चौक, एम्पायर इस्टेट, तापकीर चौक, काळेवाडी चौक, रक्षक चौक, राजीव गांधी ब्रिज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, एनसीसी मुख्यालय, नळस्टॉप चौक, भेलके चौक, नळस्टॉप चौक, लक्ष्मीनारायण चौक, सेव्हन लव्हज चौक, टर्फ क्लब, नॅशनल वॉर मेमोरियल, साधू वासवानी चौक, शनिवारवाडा, साखर संकुल, एफसी रोड आणि जंगली महाराज रोडवरील बाल गंधर्व रंगमंदिर येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×