सोमवार पेठेत भरदिवसा घरफोडी; ३ लाखांचा ऐवज चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गजबलेल्या सोमवार पेठेतील सोसायटीत भरदिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ३ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्रांतवाडी, खराडीत दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. हा भाग गजबलेला आहे. मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास महिला सदनिका बंद करुन बाहेर पडल्या. सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील तीन लाख १२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दुपारी पावणेतीनच्या सुमारास त्या घरी परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिर ते ओैंदुबर मंडळ परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहेत.

कात्रजमधील आंबेगाव परिसरात सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शनिनगर परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×