विश्रांतवाडी, खराडीत दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरी

खराडी, हडपसरमध्ये फ्लॅटमधून लॅपटॉप चोरीला

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील विश्रांतवाडी आणि खराडी भागात चोरट्यांनी दोन दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरून नेल्याची घटना घडली. विश्रांतवाडीतील शांतीनगर परिसरात दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ३७ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांचे शांतीनगर परिसरातील प्रेमराज काॅम्प्लेक्स इमारतीत दुकान आहे. चाेरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील एक लाख ३७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत.

समर्थ क्रॉप केअर कंपनीचा मालकाला पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक – सविस्तर बातमी

दुसऱ्या एका घटनेत नगर रस्ता परिसरातील खराडी भागात असलेल्या एका दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील एक लाख १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याबाबत एका व्यावसायिकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांचे खराडीतील विठ्ठल हाईट्स इमारतीत दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही चित्रीकरणात चोरटे दुचाकीवरुन आल्याचे दिसून आले आहे. सहायक निरीक्षक गणेश जगदाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×