समर्थ क्रॉप केअर कंपनीचा मालकाला पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक

महिलांची आर्थिक केली फसवणूक

marathinews24.com

पुणे – समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या माध्यमातून महिलांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीचा मालक प्रशांत अनिल गवळी याला अटक केली आहे. महिन्याला पाच टक्के नफा व पाच टक्के मुद्दल रक्कम अशा प्रकारे १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून सुमारे १५ कोटी रक्कम उकळल्याचा आरोप गवळी याच्यावर आहे.

सायगावमध्ये मध्यरात्री गोळीबार; आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी

महिलांना पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त करून प्रत्येक रकमेवर दर महिन्याला एकूण १० टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सुरुवातीचा काही काळ परतावा दिल्यानंतर मुद्दल व उर्वरित रक्कम परत न करता गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी समर्थ क्रॉप केअर कंपनीसह प्रशांत अनिल गवळी व अन्य गुंतवणुकदारांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग झाल्यानंतर आरोपी प्रशांत गवळी याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर गुरूवारी (दि. २२) त्याला अटक करण्यात आली.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, समर्थ क्रॉप केअर प्रकरणात फसवणूक झालेल्या अन्य नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखा येथे संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×