Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

सायगावमध्ये मध्यरात्री गोळीबार; आरोपीला बेड्या

दोन पिस्तूलसह बर्दापूर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव येथे तरुणाने गोळीबार केल्याची घटना दि.२१ जानेवारीला रात्री दोनच्या सुमारास घडली आहे. घटनेने सायगाव परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबार करणाऱ्या सय्यद अहमदअली मुब्बशीरअली हाशमी (वय ३५) तरुणाला बर्दापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने विनापरवाना घातक शस्त्रे बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गोळीबार केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती.

कोळवाडीत बिबट्याचा वावर; महिलेवर केला हल्ला – सविस्तर बातमी

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोळीबार करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत . याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश विक्रम तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे. बर्दापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक घुले यांच्या पथकाने कारवाई केली.

झडतीदरम्यान आरोपीकडे परदेशी ‘मेड इन युएसए’ बनावटीची ९ एमएम पिस्टल, ‘मेड इन जपान’ बनावटीची रिव्हॉल्वर, तीन जिवंत काडतुसे आढळून आले आहे. मोटारसायकल आणि १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . गोळीबार करणाऱ्या आरोपीवर शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता कलम ११० अन्वये कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घुले तपास करत आहेत. आरोपीने ही शस्त्रे कोठून आणली याचा तपास पोलीस करत आहेत .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×