Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

कोळवाडीत बिबट्याचा वावर; महिलेवर केला हल्ला

शेतमजुरांमुळे मोठा अनर्थ टळला

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – शिरूर कासार तालुक्यातील कोळवाडीतील ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि . २१) घडली आहे. घटनेमुळे संपूर्ण शिरूर कासार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनकर्णिका शिवराम नेटके असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले महिलेचे नाव आहे , ही घटना रुपुर शिवारातील गट क्रमांक २५ मध्ये दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

डेटिंग ॲपद्वारे बोलवून घेत तरुणाला लुटले – सविस्तर बातमी

शेतातील कामात व्यस्त असलेल्या मनकर्णिका यांच्यावर बिबट्याने झडप घातली. मात्र त्यांनी आरडा ओरडा केल्यामुळे शेजारील शेतात काम करणाऱ्या मजुरांनी तातडीने धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढला. शेतमजुरांमुळे महिलेचा जीव वाचला असून अनर्थ टळला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या मनकर्णिका यांना तातडीने शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

फुलसावंगी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाने यापूर्वीच सांगितले होते. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. दिरंगाईचा फटका महिलेला बसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. कोळवाडीच्या सरपंच पूजा नेटके यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर वनरक्षक नवनाथ काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा पूर्ण केला आहे. वनविभागाने आता या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांनी शेतात काम करताना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×